शिवाजी पार्क की शिवतीर्थ? शिवसेनेचा दसरा मेळावा नक्की कोठे होणार?

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेने अद्याप परवनागी दिलेली नाही त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढलेली आहे. काल महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्ड ऑफिसबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. काहीह झाले तरी शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्याचा निर्धार शिवसेनेकडून करण्यात आलाय. दरम्यान आज शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही, याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता आहे.
या वादात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती. अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी. यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत. शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी. राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळावेत असेही अजित पवार यांनी म्हटले होते. तेव्हा आता उद्या येणाऱ्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.