ठाकरे कि शिंदे ! धनुष्यबाणाशिवाय निवडणूक झाल्यास कोण जिंकणार?

राज्याच्या सत्तासंर्घषात आता महत्त्वाचा ट्विस्ट पहायला मिळतो आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची याचा निकाल आता निवडणूक आयोग घेणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे बहुमत पाहून निर्णय घेतला जाणार आहे. ही प्रक्रिया मोठी आणि दीर्घकाळ चालणारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णयहोण्याआधीच निवडणूक लागली, तर दोन्ही बाजूंना धनुष्यबाणाशिवाय रिंगणात उतरावं लागेल. त्यामुळे धनुष्यबाणाशिवाय निवडणूक झाली तर कोणाला दोन्ही गटापैकी कोणाला फायदा आणि तोटा होईल हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट आता धनुष्यबाणासाठी लढणार आहेत.आयोगाकडून तीन गोष्टींपैकी एक गोष्ट होवू शकते. एकतर धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंना मिळेल, दुसरं म्हणजे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल. आता आपण तिसऱ्या पर्यायाचा विचार करुया समजा आयोगाने चिन्ह गोठवलं तर निवडणुकीच्या आखाड्यात ठाकरे आणि शिंदे गटाची ताकद जवळजवळ सारखी असेल पण दोघांच्या सत्तासंघर्षात याच दोन फॅक्टर महत्त्वाचे आहेत. शिंदे गट सत्तेत आल्यापासून ठाकरेंच्या अडचणी वाढत आहेत. कधी पदाधिकारी फुटत आहेत तर मविआच्या काळात घेतलेले निर्णय रद्द करण्यात येत आहेत. चारीबाजूंनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गट करतोय. या संकटकाळात ठाकरे लढत आहेत शिवसैनिकांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत

यासगळ्यात ठाकरेंना राज्यातील जनतेचा पाठिंबा तर मिळतोच आहे शिवाय सहानुभुतीचा फॅक्टर हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. आपण पाहिलं असेल जेव्हा उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर आले होते अनकेजण रडत होते त्यामुळे सहानुभुतीचा फॅक्टर निवडणूकीचं चित्र बदलू शकतो. याचीच भीती एकनाथ शिंदे यांना आहे. सहानुभुतीचं पारडं ठाकरेंच्या बाजून जास्त आहे म्हणून शिंदे गटामध्येही अस्वस्थता असल्याचं म्हटलं जातंय. पण सहानुभुती किती काळ राहते आणि शिवसैनिकांचं नेटवर्क किती साथ देत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. 

आता दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे सत्तेचा ज्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना आहे. शिंदेगटाकडे ४० आमदार, १२ खासदार आहेत. तसंच मुख्यमंत्रीपदासह ९ मंत्रीपदंही आहेत. शिवाय दररोज शिंदे गटात  इन्कमिंग सुरू आहे. कधी नगरसेवक तर कधी पदाधिकारी, आजी माजी शिंदे गटात येत आहेत. निवडणुकीच्या राजकारणात सत्तेचा हा फॅक्टरकडे म्हणजे हुकमी एक्का म्हणायला हवा. 

सत्ता चालवण्याचे शहाणपण आणि ठाकरेंना असलेली सहानुभुती नियंत्रणात ठेवण्याचं मोठं काम शिंदे गटाला करायचं आहे. तेव्हा आता येणारा काळच सांगले हे दोन फॅक्टर कसे काम करतात ते आणि धनुष्यबाणाशिवाय निवडणूक झाली, तर कोण जिंकेल? हे समजेलच 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.