मातोश्रीवर बैठक, शिवसेनेच्या गोटात काय सुरु?

शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवले आहे. त्यानंतर शिवसेनेकडून चिन्हासाठी आणि पक्ष नाव म्हणून प्रत्येकी तीन नावं सुचवण्यात आलेले आहे असे वृत्त काही वृत्तवाहिन्यावंर दाखविण्यात आले होते. त्यावर ठाकरे गटाकडून खुलासा करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी भूमिका मांडलेली आहे तसेच मातोश्रीवर बैठका आणि घडामोडी सुरुच आहेत.

शिवसेना नेते अनिल देसाई दिल्लीमध्ये असून त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. देशातली निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि निरपेक्ष करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.पण त्या गोष्टी बाजूला ठेवून अशा प्रकारचा धक्कादायक निर्णय देणं हे मुळातच अपेक्षित नव्हते असेही देसाई यांनी सांगितले.

दरम्यान त्रिशुल, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय ठाकरे गटाने सूचवल्याची चर्चा होतेय. त्यावर अनिल देसाई म्हणाले या गोष्टींची आम्हाला कल्पना नाही. अशा गोष्टी माध्यमांना अगदी जिथे न पोहचे रवी तिथे पोहचे कवी अशा पद्धतीनं पसरवल्या जात आहेत पण जे काही चिन्ह असेल, त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. आम्हाला आमच्या अपेक्षप्रमाणे चिन्ह मिळावं असं नक्कीच वाटतं. कारण राज्यातील महत्त्वाचा पक्ष आहे. माध्यमांमधून चिन्ह आणि नावांच्या पर्यायाची माहिती दिली जात आहे. पण अशाप्रकारचं काहीही नाहीये असे अनिल देसाई यांनी स्पष्ट म्हटले आहे. नावा संदर्भातसुद्धा माध्यमांमध्ये जे दाखवलं जात आहे ते वृत्त देखीलअनिल देसाईंनी फेटाळून लावलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.