सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत शिवसैनिक आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणात दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. याविरोधात शिवसेना अॅक्शन मोडमध्ये आली होती. रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे बडे नेते एकापाठोपाठ एक दाखल होताना दिसले होते. अरविंद सावंत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवेही हे देखील पोलीस ठाण्यात आल्या होत्या.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. आमच्या अनिल परब यांनी कायद्याचा कीस काढून पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केला, असं वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. आमचे शिवसैनिक याची तक्रार दाखल करायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.