उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत ?

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली.शिंदेनी आमदार आणि खासदारांना आपल्या बाजूने केले.अगदी नगरसेवक, पदाधिकारीसुद्धा शिंदे गटात सहभागी झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर मविआ सरकारचे अनेक निर्णय रद्द केले. शिंदेनी एकापाठोपाठ एक अनेक धक्के ठाकरेंना दिले. आता तर मित्रपक्षाने सुद्धा ठाकरेंना गोत्यात आणलं आहे. मविआमध्ये शिवसेनेने काँग्रेसचा हात पकडला. जेव्हा शिंदेनी बंड केला त्यावेळी काँग्रेसने शिवसेनेची बाजू घेतली संकटकाळात चांगली साथ दिली पण आता घोडं अडलं आहे ते विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी !

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी करण्यात आली पण यावर काँग्रेस आक्षेप घेतलाय. जेव्हा शिवसेनेकडून अंबादास दानवेंनी विधानपरिषदेसाठी अर्ज केला पण काँग्रेसला ही गोष्ट पटली नाही. काँग्रेसला विश्वासात घेण्यात आलं नाही असा आरोप करण्यात आला. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप असून आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोललं पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करुनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली होती. मात्र विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदी अंबादास दानवेंची नियुक्ती केल्यामुळे काँग्रसेन जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.