शिवसेनेच्या डोंबिवली शाखेत आज ( २ ऑगस्ट) शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिंद गटाचे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. शिंदे गटाचे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली शाखेत घुसले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. अगदी खरी शिवसेना कोणाची ते धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे .जाणार हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला. दररोज दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करतच असतात दरम्यान आज तर हा संघर्ष डोंबिवलीमध्ये पहायला मिळाला.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील याच शाखेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढण्यात आला होता. त्यामुळे शिंदे समर्थक आक्रमक झाले होते. अखेर आज ३०० ते ४०० जणांनी शिवसेनेच्या या शाखेत घुसून तिथे ताबा घेण्याचा प्रयत्न केला. महिला, तरुण वर्ग आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनगर पोलीस या ठिकाणी तातडीने पोहोचले आणि त्यांनी संघर्ष सोडविण्याच प्रयत्न केला. दोन्ही गट आक्रमक झाले होते आणि त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की ही करण्यात आली.