उद्धव ठाकरेंचा ‘दैनिक सामना’ संदर्भात मोठा निर्णय

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामना वर्तमानपत्रात बदल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाची जबाबदारी आता स्वतःच्या हातात घेतली आहे. संजय राऊत यांनी ईडीकडून अटक केल्यानंतर आता सामनाच्या प्रिंट लाईनमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव संपादक म्हणून छापण्यात आलेले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला होता. २०२०मध्ये दैनिक सामना या वर्तमानपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे यांनी संपादकपदाची जबाबदारी पुन्हा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत आहेत. .
संजय राऊत यांना अटक आणि कोठडी मिळाल्यानंतर सामनाचे अग्रलेख आणि रोखठोक कोण लिहीणार यावर चर्चांना सुरुवात झाली होती. अशी ही माहिती हाती आली की संजय राऊत यांनी कोर्टाकडे अग्रलेख लिहिण्याची परवानगी मागीतली होती पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी सामनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.आता दैनिक सामनाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे येत्या काळात शिंदे सरकावर जोरदार घणाघात होणार यात शंकाच नाही