दसरा मेळाव्यात ठाकरे परिवार हुकुमाचा एक्का बाहेर काढणार? नव्या पोस्टरची चर्चा

शिवसेनेचा दसरा मेळावा नक्की कुठे होणार तसेच शिवाजी पार्कवरील मैदानाची जागा कोणाला मिळणार उद्धव ठाकरे यांना किंवा शिंदे गटाला याबद्दल अद्याप ठोस माहिती हाती आलेली नाही. राज्यभर सध्या दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. दादरमधली शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही आता शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. यामधील एक फोटो पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत
तो फोटो आहे तेजस ठाकरे यांचा आहे. तो फोटो पाहून पुन्हा एकदा तेजस राजकारणात येणार का याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे दसरा मेळाव्या संदर्भातील पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरेंचाही फोटो लावण्यात आलाय.विशेष म्हणजे दसरा मेळाव्याचा पत्ता शिवाजी पार्क हाच देण्यात आलाय.
यंदाच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा सध्या सुरु आहे त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे लाँच होणार असल्याचं दिसत आहे.या पोस्टरमध्ये आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ अशी कॅच लाईन देण्यात आली आहे. दसरा मेळाव्याची जागा अद्यापही ठरलेली नाही. याआधी एक पोस्टर व्हायरल झालं होते आता हे दुसरं पोस्टर असून त्यात शिवाजी पार्क असा स्पष्ट उल्लेख आहे. जर शिवाजी पार्क मिळालं नाही, तर रस्त्यात उभं राहून भाषण करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय.