भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार, ठाकरे गटाचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर वार

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहे. आमचे चिन्हे एकमद परफेक्ट आहे. ढालीनं जनतेचं रक्षण करायचं आणि दुश्मन अंगावर आलं तर तलवार उगारायची असे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले आहे तर ठाकरे गटाने या चिन्हावरुन देखील शिंदे गटावर टीका केलेली आहे. भाजपची ढाल आणि गद्दारीची तलवार मिंधे गटाला मिळाली असाच बोध या चिन्हातून होतो आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे.
अंबादास दानवे सध्या अकोला अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाच्या गद्दारी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या जीवाला लागलेली आहे. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहोत. तर शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आम्हाला आग लावणारं चिन्ह नको होते, असं म्हणत ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरून जोरदार टोलेबाजी केलेली आहे.