“शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह दोन्ही गटाला तात्पुरते तरी वापरता येणार नाही असा निर्णय दिला. त्याचे राजीकय पडसाद उमटायला लागले आहेत. शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून नवे चिन्ह आणि नावासाठी जोरदार लढाई सुरु असल्याचे चित्र आहे. यावर आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलंय.
#शिवसेना अंतरिम आदेशाने @ShivSena निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे.
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) October 8, 2022
उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल.शिवसेना नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल.
चुकीची माहिती देऊ नये. @ShivsenaComms
निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलंय.उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोन्ही पक्षांना ‘धनुष्यबाणा’ऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. तसेच, शिवसेना नावही वापरता येणार आहे. परंतु, त्याला काहीतरी समोर नाव जोडावे लागेल. चुकीची माहिती देऊ नये असे ट्वीट नीलम गोऱ्हे यांनी केलेले आहे. दरम्यान अंधेरी-पूर्वी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पक्ष चिन्ह आणि नाव ठरवले जाणे महत्त्वाचे आहे. कारण त्यानंतरच प्रचार आणि पुढची रणनीती आखली जाणार आहे,