संदिपान भुमरेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल !

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि ठाकरेंच्या सेनेत उभी फुट पडली. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना शिंदेंनी पाठिंबा देणारे मविआमधील पहिले कॅबिनेट मंत्री होते संदिपान भुमरे ! आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करत आहेत. खास करून बंडखोर आमदार आणि खासदार यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा घेतली जाते आहे. काल संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यासंदर्भात संदीपान भुमरे यांना त्यांच्या कार्यकर्त्याने फोन केला होता. त्यांचे बोलणे व्हायरल झालेले आहे. भुमरे आणि त्यांचा कार्यकर्ता यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे पण आम्ही त्याची पुष्टी करत नाही. ज्या कार्यकर्त्याने फोन केला होता त्याचे नाव योगेश क्षीरसागर आहे, त्याने आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाचा दाखला देत भुमरेंना चांगलाच टोला लगावला आहे. साहेब तुम्ही असं करायला नको होतं असं तो भुमरेंना म्हणाला.
क्षीरसागर यांनी भुमरेंना फोन लावला आणि म्हणाला, तुमच्या पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, तुम्हाला मतदान करणारे लोक त्यांच्यासोबत जातील असं योगेश क्षीरसागर यांनी भुमरे यांना सांगितलं.