शर्मिला ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची प्रतिक्रिया

शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठं नुकसान सोसावं लागलं. आमदार,खासदार, नगरसेवक अगदी शाखाप्रमुख देखील साथ सोडून निघून गेले. या संकटाच्या काळात ठाकरे बंधुंनी एकत्र यावे असा सुर कार्यकर्त्यांमध्ये होता. दरम्यान रविवारी पुण्यामध्ये शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे बंधु एकत्र येणार का यावर सुचक विधान केलं त्याला शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आलेली आहे.
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले, मनसेकडून शिवसेनेला अजून प्रस्ताव आलेला नाही. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र येणार का किंवा त्यांना एकत्र येण्यासाठी कोण पुढाकार घेणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साद घातली तर येऊदेत असे म्हटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे बंधु एकत्र येणार का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.