‘ती’ मुलाखत आणि शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिलेल्या मुलाखतीतून बंडखोरांवर जोरदार आरोप केले आहेत. वादळ म्हटलं की पालापाचोळ उडणारच, सध्या तोच उडतो आहे पण एकदा पालापाचोळा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आलेली आहे.
शिंदे गटाचे समर्थक संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आमचं आयुष्य शिवसेनेत गेलं पण आम्ही पालापाचोळा नाही असे प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंनी टीका करताना यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागला आहात अशी टीका केली आहे. यावर शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतःदेखील शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत. आम्हाला शिवसेनाप्रमुख होण्याची गरज नाही.त्यांच्याबदद्ल आम्ही असं कोणताही वक्कव्य केलेलं नाही. आम्ही त्यांच्याबरोबर कधीच बरोबरी केलेली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात आधी बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी गेले होते ही आमची निष्ठा आहे. आम्ही तुम्हाला विसरु पण शिवसेनाप्रमुखांना विसरणार नाही’ असंही शिरसाट म्हणाले.
‘बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळे आम्ही मंत्री, आमदार, खासदार झालो. राजकारण करायचे असेल तर आपला ठसा उमटवा. शिवसेनाप्रमुखांना का खाली खेचत आहात? ते फक्त तुमची संपत्ती नाहीत. शिवसेनप्रमुख हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत आहेत’ असा इशारासुद्धा शिरसाट यांनी दिलाय.