शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना, तर ठाकरे गटाला मिळालं हे नाव !

निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे. तसेच मशाल हे चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. त्यानंतर शिंदे गटाला कोणते नाव मिळते याबद्दल उत्सूकता होती त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेले आहे. निवडणूक आयोगाकडे बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी नवीन नाव आणि चिन्हासाठी कागदपत्र दिलेली होती. त्यावरुनच निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दोन्ही गटांकडून जी नावे देण्यात आली होती त्यातील दुसरा पर्याय निवडणूक आयोगाकडून निवडण्यात आलेला आहे.
निवडणूक आयोगाला चिन्ह देताना उद्धव ठाकरे यांनी त्रिशुळ या चिन्हाची मागणी केली होती पण ते धार्मिक चिन्ह असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून नकार देण्यात आला. तर उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचे चिन्ह असल्यामुळे ते चिन्ह देता आले नाही. तेव्हा तिसरा पर्याय म्हणून मशाल चिन्ह ठाकरे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला आहे. शिंदेगटाने चिन्ह देताना उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हे तीन पर्याय दिले होते त्यातील पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक असल्यामुळे ते देता येणार नाही असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह बाद करण्यात आली आणि त्यांनी नव्याने चिन्ह द्या असे सांगण्यात आलेले आहे.