‘ठाकरें’ची ‘ही’ खेळी, ‘शिंदें’साठी धोक्याची घंटा?

दिवसेंदिवस शिंदे गटाला मिळत असेलेला पाठिंबा, मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयाला लावलेले सुरुंग यामुळे शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर तर शिंदेंनी एकापाठोपाठ एक दौरे सुरु केले.  त्यामुळे मातोश्रीवरचं टेन्शन अधिकच वाढलं.शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा सुरु केली पण पक्ष पातळीवर नक्की कोणाचं वर्चस्व यासाठी ठाकेर आणि शिंदे जोरदार प्रयत्न करतायेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी खेळी करताना शिवसेनेच्या दोन नेत्यांना प्रमोशन दिलं.ते दोन नेते म्हणजे पहिले आहेत अरविंद सावंत तर दुसरे आहेत भास्कर जाधव. या दोघांची नेतेपदी निवड करण्यात आलीय.  

शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी पक्ष बांधणीच्या कामात अगदी खास लक्ष घातलेलं आहे. शिंदेंच्या बंडानंतर मोजकीच मंडळी ठाकरेंसोबत राहिली आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे प्रमोशन करण्यात आले. अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांचे खूप जवळचे मानले जातात. केंद्रात आणि राज्यात सावंत यांनी ठाकरेंना कायम साथ दिलेली आहे. आता सावंत यांची जबाबदारी वाढली असून एकनिष्ठतेचे फळ त्यांना मिळालेले आहे. दुसरीकडे भास्कर जाधव म्हणजे शिवसेनेची विधीमंडळातील तोफ असंच म्हणावं लागेल. आपल्या वाणीने सत्ताधारी पक्षाला घेरणारे जाधव यांचीही नेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर शिवसेनेचे पहिल्या फळीचे नेते लीलाधर डाके यांचे सुपुत्र पराग लीलाधर डाके यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. निष्ठावंतांना पद आणि प्रमोशन देण्याची ठाकरेंची ही खेळी शिंदेंनी भारी पडू शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.