शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टिझर पाहिला का?

दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. दोन्ही गट जय्यत तयारी करत असून आता तर वातावरण निर्मितीसाठी मेळाव्याचे टीझर देखील रिलीज करण्यात आले आहेत. काही वेळापूर्वीच शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान… निष्ठेचा सागर उसळणार असे या टीझरमध्ये म्हटलेले आहे. आधीच्या दसरा मेळाव्यात शिवाजीपार्क येथे झालेली गर्दी, उद्धव ठाकरे त्यात दिसत असून बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील ‘माझ्या तमाम हिंदू मराठी बंधू आणि भगिनींनो’ ही ट्रेडमार्क लाईनसुद्धा ठाकरेंच्या टीझरमध्ये वापरण्यात आलेली आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA
ठाकरे गटाकडून रिलीज करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यातील टीझरमध्ये शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन करण्यात आले आहे. ट्विटमध्येपण या आवाहनाचा उल्लेख पहायला मिळतो आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची छाप या टीझरमधून पहायला मिळते आहे.
गुरुवारी शिंदे गटानेही दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर आणि टीझर रिलीज केला होता. त्यात एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ अशा ओळी असून त्यातही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरण्यात आलेला आहे. दोन्ही गट मेळावाच्या माध्यमातून पक्षातील इनकमिंग वाढविण्यावर भर देणार आहेत. दोन्ही नेते भाषणाच्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडणार यात शंकाच नाही.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022