CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ; ‘या’ दिवशी जाहीर सभा

यंदाचा दसार मेळावा अभुतपूर्व असा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारा हा पहिला दसरा मेळावा आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा प्रथेपरंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे चार दिवसांनंतर परत जाहीर सभा घेणार आहेत. ही जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच होणार आहे.
९ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या टेंभी नाका इथं उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतून थेटपणे ते एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरु शकते अशी चर्चा रंगलेली आहे कारण त्यानंतर काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यत आहे.
राज्यातील राजकारणाकडे पाहता दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीएत. आपणच खरी शिवसेना हे स्पष्ट करण्यासाठी दोन्ही गटात जोरदार संघर्ष सुरु आहे.आता उद्धव ठाकरे ठाण्यात सभा घेणार तर चर्चा होणार यात शंकाच नाही.ठाण्यात मूळ शिवसेनेचे बस्तान हलू न देणं तसेच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला उद्धवस्त करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होणार आहे. या सभेचा किती परिणाम होतो हे पहाणं महत्वाचं ठरेल.