युवासेना की ‘चिरंजीव’ सेना? शिंदेंना युवासेना महागात पडणार?

आपणच खरी शिवसेना असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली युवासेनासुद्धा जाहिर केली आहे. युवासेनेची नवी कार्यकारीणी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेवून युवासेनेची कार्यकारीणी जाहीर केली. यामुळे शिंदे गट अगदी ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे. सोशल मीडियावरसुद्धा याची चर्चा होत असून ही युवासेना की चिरंजीवसेना असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात येतोय.
शिंदे गटाच्या कार्यकारीणीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना त्यात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ठाकेर गटावर घराणेशाहीचा आरोप करणारे शिंदे यांनी नवीन काय केलं अशी टीका सुद्धा होवू लागली आहे. आता आम्ही असं का बोलतोय कारण शिंदे गटाची युवा कार्यकारीणी पाहिली तर तुम्हाला दिसेल दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे यांच्या मुलांना युवासेनेतल्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्यांनासुद्धा शिंदे गटातील कार्यकारीणीत स्थान देण्यात आलेले आहे.
आता कार्यकारीणीत कोण आहेत ते पाहून घेवू. मुंबईमध्ये समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे, तर कल्याण-भिवंडी – दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक आणि ठाणे, नवी मुंबई व पालघरात नितीन लांडगे, विराज म्हामूणकर, मनीत चौगुले, राहुल लोंढे यांच्यावर जबाबदारी आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे आहेत.उत्तर महाराष्ट्र आविष्कार भुसे तर मराठवाड्यात अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील युवा कार्यकारीणीत किरण साळी, सचिन बांगर तर विदर्भात ऋषी जाधव, विठ्ठल सरप-पाटील युवासेनेच्या कार्यकारीणीत आहेत.