उपराजधानी नागपुरातून ७ महिन्यांत ९५८ महिला बेपत्ता!

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरातून एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. नागपुरातून अवघ्या ७ महिन्यात ९५८ महिला बेपत्ता झालेल्या आहेत. नागपूर पोलिसांकडून ही माहिती मिळालेली आहे. महिला बेपत्ता होण्याची वेगवेगळी कारणे हाती आलेली आहेत.नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते जुलै महिन्यात नागपुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये महिला बेपत्ता होण्याच्या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता होणाऱ्या महिलांमध्ये २१ वर्षाखालील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या सात महिन्यात तब्बल ३१२ तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आलेली आहे आणि रागाच्या भरात घर सोडून जाणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाढती प्रेमप्रकरणं, प्रेमात जर कुटुंबाचा अडसर असेल थेट पळून जाण्याचा मार्ग स्विकारणे. त्यामुळे महिलांपाठोपाठ तरुण मुलीदेखील घर सोडून जात आहेत. देशाची उपराजधानी असणाऱ्या नागपुरात नक्की काय सुरु आहे तेच कळत नाही. सरकारमधील उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे आहेत. केंद्रातही नागपूरचे मंत्री आहेत या प्रश्नांकडे ते लक्ष देतील का हेच पाहणं आता महत्त्वाचे आहे.