श्रावणात मांसाहार का करु नये?

श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, सर्वाधिक उपवास श्रावण महिन्यात येत असतात. श्रावण महिन्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार पूर्णपणे बंद केला जातो. सर्वसाधारणपणे लोकं हलका आहार घेत असतात. श्रावणात मांसाहार बंद करणे यामागे खरंतर शास्त्रीय कारणे देखील आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे वातावरणात झालेला बदल आणि प्राण्यांचा प्रजनन काळ.

श्रावण म्हणजे सगळीकडे पाऊस पडत असतो. वातावरण ओलसर आणि दमट झालेलं असतं. सुर्यप्रकाश फारसा येत नाही अशा वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असतात आणि तोच मांसाहार आपण केला तर शारीरिक व्याधी होवू शकतात त्यामुळे श्रावणात मांसाहार करणे योग्य नाही असे सांगितले जाते. 

श्रावण महिना म्हणजे प्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो. किटक आणि प्राणी यांच्यात गर्भधारणा होत असते. आता या काळात मासेमारी झाली तर माशांच्या प्रजाती धोक्यात येतात शिवाय गर्भधारणा झालेल्या माशांचे सेवन करणे यामुळे आपल्या हार्मोन्समध्येही बदल होवू शकतात पावसाळ्यात अनेक जलजन्य रोग पसरतात त्याचा संसर्ग माशांमार्फत आपल्याला होवू शकतो. म्हणजे एकूण काय तर मांसाहारामुळे आपल्या शरीराला अपाय होवू शकतो. 

पावसामुळे वातावरणात दमटपणा वाढतो. एकदा वातावरणात बदल झाले की त्याचा परीणाम आपल्या शरीरावर होतो. आपल्या पचनशक्ती या काळात मंदावलेली असते त्यात जर तुम्ही मासे, मटण किंवा मांसाहारी आहार केला तर तो पचायला जड जातो. म्हणून श्रावणात नॉनव्हेज पदार्थ खावू नका असे सांगितले जाते. शक्यतो हलका आहार घ्या म्हणजे श्रावणात आपली प्रकृती अगदी उत्तम राहू शकते.

पावसात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बुरशीचे प्रमाण वाढते. अन्नाच्या बाबतीतही हेच म्हणावे लागेल की उच्च आर्द्रतेमुळे अन्नावरही बुरशी लागू शकते. मांसाहारवर त्याचा जास्त परीणाम होतो म्हणून श्रावणात मांसाहार करु नये. 

आपले सणवार हे सगळे वातावरणात होणारा बदल याप्रमाणेच साजरे केले जातात. त्याचा आनंद घेता यावा आणि यासंदर्भात सांगितलेले नियम जाचक वाटू नये म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे. तेव्हा श्रावणाचा आनंद घ्या, हलका आहार करा, वर्षातील एक महिन्यात जर तुम्ही मांसाहार टाळला तर बाकीच्या कालावधीत तुमची प्रकृती नक्कीच उत्तम राहू शकते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.