व्हायरल फोटोवर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया !

खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादीकडून ट्विट करण्यात आला होता. शिंदेंच्या खुर्चीत सुपुत्र अशा आशयाचा तो फोटो होता. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.
हे सगळं हास्यास्पद आहे. हा फोटो सगळीकडे शेअर केला जातोय. त्याची चर्चा सुरु झाली आहे. मला वाटतं विरोधकांनी आता टीका करायला काही उरले नाही म्हणून ते असे बोलत आहेत. हे आमचे खासगी निवासस्थान आहे, इथे आम्ही दोघे गेली अनेक वर्षे बसतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो.आज मुख्यमंत्री यांची एक व्हीसी होती, त्यासाठी ‘महाराष्ट्र शासनाचा’ बोर्ड मागे ठेवला होता पण मला ते माहीत नव्हतं’. यापुढे श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री अठरा तास काम करत आहेत, त्यांच्यावर टीका करायला बाकी कोणते मुद्दे मिळत नाही, म्हणून असे मुद्दे काढले जात आहेत. लोकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, असे मुद्दे काढून काही होणार नाही, आम्ही आमचे काम करत आहोत. तसेच हे शासकीय घर नाही, तर हे घरचं कार्यालय आहे असे ही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.