सिम कार्ड खरेदी करताय? नवी नियम माहित आहेत का?

तुम्ही नवीन सीम कार्ड खरेदी करण्याच्या विचारात असाल तर सरकारच्या नवीन नियमांची माहिती करुन घेणे गरजेच आहे.सीमकार्ड खरेदी करताना आता वयासंदर्भातील नियम देखील बदलेला आहे.दररोज हजारो सीमकार्ड इश्यू केली जातात आणि नवीन मोबाईल नंबर सक्रिय होत असतात.दूरसंचाक कंपनी कमी त कमी डाक्यूमेंटेशन प्रोसेससह सिम कार्ड विकण्यावर भर देत असतात. मात्र आता भारत सरकारनेच नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमानुसार भारतीय ग्राहक घरी बसून ऑनलाईनपद्धतीने नवीन सीमकार्डसाठी अप्लाय करु शकतात. पण काही ग्राहकांना मात्र सीमकार्ड घेणे कठिण जाणार आहे. ते नवीन नियम पुढील प्रमाणे आहेत.
- भारतात 18 वर्षांखालील मोबाईल युजर आता त्यांच्यासाठी कोणत्याही कंपनीचं सिम कार्ड विकत घेऊ शकणार नाहीत.
- मानसिक रुग्ण किंवा अस्थिर मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला देखील नवीन सिम कार्ड जारी केले जाणार नाही.
- Aadhaar based e-KYC न करणाऱ्या ग्राहकांना देखील नवीन सिम इश्यू करता येणार नाही.
सप्टेंबर 2021 च्या कॅबिनेटद्वारे अप्रूव्ड टेलीकॉम रिफॉर्म्सनुसार DoT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनच्या नियमांतर्गत ही माहिती देण्यात आली आहे.