“मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

राज्यात दोन दसरा मेळावे झाले तरी त्याची चर्चा सुरुच आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला.तर दुसरीकडे शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात दोघांकडून वाक् युद्ध चांगलंच रंगलेलं पहायला मिळालं.
शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकरने हजेरी लावली होती. अवधूतने नव्या जोमात शिवसेना शिवसेना गाणे सादर केले. काही दिवसांपूर्नी शिंदेंच्या वाढदिवसाला तो उपस्थित होता तेव्हा अवधूतने लोकनाथ हे गाणं गायलं होतं.या दोन्हीही कार्यक्रमानंतर अवधूत गुप्ते शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती. दरम्यान अवधूतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय.
यात त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले. ‘मी तुमच्या गटाचा !’ असं अवधुतने पोस्टच्या सुरुवातीला म्हटलंय. माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचे साधे प्राथमिक सदस्यत्व सुद्धा नाही. तसेच मी कोणत्याही पक्षामध्ये किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही सगळे माझे मायबाप आहात त्यामुळे तुम्हाला याचं स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो असे अवधूतने स्पष्ट केले आहे. मी याआधी अनेक राजकीय व्यासपीठावर मी कला सादर केलेली असून माझ्या लेखी हा विषय येथेच संपला आहे असेही अवधूतने म्हटले आहे.