सोनिया गांधी यांची ईडी चौकशी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहात. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यापूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. खरंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यामुळे प्रकृतीच्या कारणाने त्यांनी नवीन तारीख मागितली होती. तेव्हा ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याचे समन्स पाठवून दिले होते. दरम्यान आज सकाळी ११ वाजता त्या ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी जाणार आहेत.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी
नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. ही चौकशी इन कॅमेरा केली जाणार आहे. ईडी सोनिया गांधी यांच्याकडून लेखी जबाब देखील घेणार आहे. या प्रकरणाची फाईल २०१५ मध्ये बंद झाली पण ईडीने पुन्हा चौकशीला सुरुवात केली आहे.

काँग्रेस देशभर आंदोलन करणार, पोलीस सतर्क
सोनिया गांधी यांची ईडी चौकशी या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरात आंदोलन करणार आहे. त्यामुळे नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालय, ईडीचे कार्यालय येते मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल आहे. काँग्रेस मुख्यालयाला बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत.

काय आहे प्रकरण?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र सुरु केले होते. हे वृत्तपत्र २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर २०१० मध्ये ‘यंग इंडिया’ जी कंपनी नव्याने स्थापन झाली होती त्यांनी ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. हे प्रकरण चर्चेत येण्यामागेच कारण म्हणजे यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर आहेत. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयकर विभागाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.