सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरु केले मोफत कोचिंग, असा करा अर्ज !!

अभिनेता सोनु सुद म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते लॉकडाऊनच्या काळात त्याने गरीब कामगारांसाठी केलेली मदत. एक अभिनेता असूनही सोनु नेहमीच सामान्य व्यक्तीमत्वाप्रमाणे वागत असतो. गरजूंना वेळोवेळी सोनु सुदने मदत केलेली आहे. अशाच एका चांगल्या कामामुळे पुन्हा एकदा सोनु सुदची सगळीकडे चर्चा होतेय. सोनू सूद IAS परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. सोनूने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने कोचिंगबद्दलची माहिती दिली आहे. 

गरजुंना मदत करण्यासाठी सोनु सुद नेहमीत तयार असतो आता त्याने विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतलेला आहे. सोनू सूद आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे.‘चला मिळून नवा भारत घडवूया. 22-23 ची संभाव्य सुरुवात. IAS परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग.’ त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘आयएएसची तयारी करायची असेल तर आम्ही तुमची जबाबदारी घेऊ.’ असं ट्विट त्याने केलेले आहेत 

या मोफत कोचिंगसाठी विद्यार्थी सोनू सूद फाऊंडेशन ग्रुपच्या लिंकवर नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाऊंडेशनने ठरवून दिलेली फी भरावी लागेल. या कोचिंगद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाइन आयएएस कोचिंग दिलं जाईल. याशिवाय फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.