सोवा व्हायरस तुमच्या खात्यातील सर्व पैसे उडवू शकतं, SBI चा ग्राहकांना इशारा

आपल्या रोजच्या जीवनशैलीत सध्या अॅप डाऊनलोड करणे हे रोजचे झाले आहे असे म्हटले तरी चालेल. पण या अॅप संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने इशारा दिलेला आहे. सोवा मालवेअरमुळे तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे उडू शकतात असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. अॅपच्या माध्यमातून हा वायरस तुमच्या फोनमध्ये एन्ट्री करेल आणि तुमच्या असेट्सवर डल्ला मारेल असं SBI ने सांगितलेलं आहे. कॅनरा बँकेनेसुद्धा खातेदारांना तसेच ग्राहकांना खबरदारीची सूचना दिली आहे. अॅन्ड्राईड फोनधारकांसाठी ही सुचना देण्यात आलेली आहे.
Don’t let malware steal your valuable assets. Always download the trusted apps from reliable sources only. Stay Alert and #SafeWithSBI#SBI #AmritMahotsav #CyberSafety #CyberSecurity #StayVigilant #StaySafe pic.twitter.com/NwAfUle36V
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 22, 2022
आता तुम्ही म्हणाल सोवा मालवेअर काय आहे SBI ने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोवा एक ट्रोजन मालवेअर आहे, जे खास करुन बँकिंग अॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांच्या पर्सनल डेटावर डल्ला मारते. याला ओळखणे आणि बाहेर काढणे हे अवघड आहे. हे ट्रोजन तुमच्या सध्याच्या सर्व अॅप्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवते.
हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आला तर त्याला बाहेर काढणे खूप कठिण आहे. तेव्हा यापासून वाचयचं असेल तर खबरदारी घेणं हा सोपा उपाय आहे. म्हणून सुरक्षेची खात्री असल्याशिवाय तुम्ही कोणतेही अॅप डाऊनलोड करु नका. अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू काळजीपूवर्क, लक्ष देवून वाचा. अॅप डाऊनलोड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना परवानगी देता याची खात्री नक्की करुन घ्या.