श्रीलंकेला मिळाले नवे राष्ट्रपती !!

श्रीलंकेमध्ये आज (२० जुलै) नव्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली त्यात काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे निवडून आले आहेत. गेल्या ४४ वर्षात प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आलेली आहे.

काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लस अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे सुद्धा राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुक रिंगणात होते. श्रीलंकेच्या संसदेत एकूण २२५ सदस्य असून बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची गरज होती. रानिल विक्रमसिंघे यांना १३४ मतं मिळाली असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी राजीनामा दिला. म्हणून तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारावा लागला.राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला. ते मालदीवला गेले आणि तिथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर १४ जुलै रोजी ते सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात राजपक्षे सरकारला अपयश आले. त्यानंतर राजपक्षे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात जनआक्रोश निर्माण झाला. त्यामुळे राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. आता राजपक्षे यांच्या जागी नवीन राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे निवडून आलेले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून जीवनावश्यक गोष्टींचा प्रचंड तुटवडा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.