Starbucks दुपारी १ ते ४ बंद राहणार?

सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील सांगता येत नाही. आता हेच बघा ना कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या स्टारबक्सने लक्ष्मण नरसिंहन यांची सीईओ म्हणून नियुक्ती जाहीर केली. याबद्दल अनेक बातम्या छापून आल्या भारतासाठी अभिमानास्पद आहे असेही बोलले गेले आणि ही गोष्ट खरी आहे. पण तुम्हाला माहित आहे का पुणेकर यामुळे जास्त आनंदी झालेले आहेत.कारण लक्ष्मण नरसिंहन यांचे होमटाऊन पुणे आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वोधिक काळा पुण्यात घालविलेला आहे. लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती झाल्यानंतर पुणेकरांनी आनंद व्यक्त केला.
आता पुणे तिथे काय उणे हे तर जगप्रसिद्ध आहे त्यामुळे पुणेरी स्टाईलने हा आनंद साजरा झाला आणि त्याचवेळी मिम्स देखील व्हायरल झाले. बरं मिम्सची ही लाट एवढी मोठी होती की ते मिम्स थेट लक्ष्मण नरसिंहन यांच्यापर्यंत पोहचले आणि त्यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. त्या मिम्समध्ये लिहीलं होतं आता स्टारबक्ससुद्धा दुपारी १ ते ४ बंद राहणार का? १ ते ४ विश्रांतीसाठी सुट्टी मिळणार का? आता तुम्हाला माहित आहे पुण्यात ही परंपरा आहे की दुपारी १ ते ४ पुण्यातील सगळी दुकानं बंद असतात. असं म्हणतात पुणेकर यावेळेत आराम करतात. या अनुशंगाने हे मिम्स व्हायरल केले गेले.
A Puneri person is the CEO of Starbucks now. Globally the stores will be shut between 1pm to 4pm.
— Gabbbar (@GabbbarSingh) September 2, 2022
पुणेकर लक्ष्मण नरसिंहन यांच्या नियुक्तीनंतर स्टारबक्ससुद्धा दुपारी १ ते ४ बंद राहणार का? यावर नरसिंहन यांनी मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले, तुम्हाला विश्वास बसणार नाही असे सल्ले मला भारतातून येत आहेत. मी काय केलं पाहिजे, यासाठी मला खूप सल्ले दिले जातायेत.मी पुण्याचा असून तिथे सर्व दुकानं दुपारी १ ते ४ या वेळेत बंद असतात. त्याच्या सन्मानार्थ मीदेखील १ ते ४ कॅफे बंद ठेवावेत असा सल्ला देत आहेत. पण तसं होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आता या स्पष्टीकरणानंतर मीम्स थांबतील अशी आशा आहे.