मुख्यमंत्र्यांच्या ‘गोविदां’बाबतचा निर्णय, पुण्यातील विद्यार्थी नाराज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. दहिहंडीत गोविंदा म्हणऊन सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे. सरकारी नोकरी मिळावी मिळावी म्हणून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळविण्यासाठी बऱ्याच वर्षांचा वेळ द्यावा लागतो. मात्र गोविंदांना थेट आरक्षण दिल्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर पसरला आहे. जे विद्यार्थी वर्षानूवर्षे अभ्यास करतात त्यांच्यावर हा अन्याय आहे अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा केली आहे. खरंतर गोविंदा पथकाकडून अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी पूर्ण केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यामुळे गोविंदांचा मोठा फायदा होणार आहे. मात्र या विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. 

दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारने सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. तसेच 18 वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसंच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकणार आहे. दरम्यान जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न सरकारने मार्गी काढावा असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसून येतोय त्यामुळे सरकारेन फेरविचार करावा अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी शर्मिला येवले यांनी केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.