विद्यार्थ्यांनाही मिळणार दरवर्षी 6 हजार रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

परिस्थिती कितीही गरिबीची असली तरी प्रत्येक मुलाने शिकावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच विविध योजना करत असतात. मोफत शिक्षण तसेच साहित्य, भोजन याचबरोबर आता राज्य सरकारेन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी शाळेत मोठ्या प्रमाणात शाळेत यावे म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रवासी भत्ता दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावलेले आहेत राज्य सरकार अशा विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी प्रवासभत्ता म्हणून दरमहा 600 रुपये देणार आहे. सुट्ट्यांचे दिवस सोडून असे एकूण 10 महिन्यांसाठी 6 हजार रुपये एकरकमी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ सरसकट सर्व विद्यार्थ्यांना मिळणार नाही तर ज्या शाळांची मान्यता रद्द झालेली आहे किंवा शाळा बंद पडलेली आहे, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. त्यातील ज्या विद्यार्थ्यांना पालक नाहीत त्यांना प्रवासखर्च म्हणून दरवर्षी 6000 रुपये अनुदान एकरकमी बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या या योजनेत काही खास निकष ठेवण्यात आलेले आहेत त्यात इयत्ता १ ते ५ च्या विद्यार्थ्यांना १ किलोमीटर परिसरात, तर इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांना ३ किलोमीटर परिसरात जर उच्च प्राथमिक शाळा नसेल तर हे अनुदान दिले जाणार आहे. शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शहरातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.पीएफएमएस प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर वाहतूक सुविधेसाठी हा निधी देण्यात येतो. आधी ३०० रुपये अनुदान देण्यात येत होते आता ते वाढवून ६०० रुपये करण्यात आलेले आहे.हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार-बॅंक खाते लिंक करण्याचे काम सुरु आहे. ही मोहीम डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.