भारतीय हवाई दलातील पायलट सुधांशू शुक्ला हे आंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. २०१९ मध्ये त्यांनी रशियाच्या गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये अंतराळ यात्री म्हणून प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर इस्त्रो कडून त्यांची गगनयान मिशन साठी निवड करण्यात आली. आता ते नासा-एक्सिओम स्पेस मिशनमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जात आहेत.
सुधांशू शुक्ला हे नासा च्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये सामील होणार आहेत. या मिशनमध्ये ते मिशन कमांडर म्हणून काम करतील. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लोज उझनान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे दोन मिशन तज्ज्ञ असतील. या मिशनमुळे भारतासोबत पोलंड आणि हंगेरीला देखील आंतराळात थांबण्याची संधी मिळणार आहे. ग्रुप कॅप्टन सुधांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर असतील.
मिशनबद्दल आपला आनंद व्यक्त करताना सुधांशू शुक्ला म्हणाले की, भारतातील लोकांशी आपले अनुभव शेअर करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांनी विविध भागांतून सांस्कृतिक वस्तू आंतराळात नेण्याची योजना केली आहे. तसेच, आंतराळ स्थानकावर योग मुद्रां चा अभ्यास देखील करणार आहेत. हे मिशन १४ दिवस चालेल, ज्यादरम्यान चालक दल सूक्ष्म गुरुत्वाकर्षण स्थितीत वैज्ञानिक प्रयोग आणि आउटरीच कार्यक्रम आयोजित करेल. Ax-4 मिशन खासगी अंतराळवीरांना आंतराळात नेण्याचा उपक्रम आहे.