‘या’ दिवशी दिसणार Supermoon, संधी अजिबात चुकवू नका !

पुन्हा एकदा आपण नैसर्गिक जादू पाहण्याचे साक्षीदार होणार आहोत. याच आठवड्यात अर्थात ११ ऑगस्ट रोजी सुपरमून दिसणार आहे. २०२२ या वर्षातील हा अखेरचा सुपरमून आहे. ११ ऑगस्टसोबत १२ ऑगस्टच्या पौर्णिमेला संपूर्ण भारतात हा सुपरमून पहायला मिळणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्राचा मोठा आकार होय. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात.जर मागच्यावेळी तुम्ही सुपरमून पाहू शकला नसाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे.
११ ऑगस्ट रोजी दिसणाऱ्या सुपरमुनचे नाव ‘फुल स्टर्जन मून’ असे ठेवण्यात आले आहे. नासाने दिलेल्या माहितीनूसार स्टर्जन शब्द हा अमेरिकी जनजाती अल्गोंक्विन येथून आलेला आहे. ही जनजाती या सीजनमध्ये दरवर्षी स्टर्जन नावाच्या माशाला पकडते. म्हणून त्या पोर्णिमाला स्टर्जन मून असे म्हटले जाते.
सुपरमून वर्षातून फक्त तीन ते चारवेळा दिसतो. २०२२ मध्ये जूनमध्ये पहिला सुपरमून त्यानंतर ३ जुलै रोजी सुपरमून दिसला होता. १९७९ मध्ये सुपरमून हा शब्द पहिल्यांदा रिचर्ड नोल यांनी वापरला होता. चंद्र आणि पृथ्वीमधील सरासरी अंतर चार लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे, पण जेव्हा सुपरमून असतो तेव्हा हे अंतर सुमारे साडेतीन लाख किलोमीटर असेल. या घटनेत ‘सुपर’चा अर्थ काही नाही. यावेळी फक्त एकच महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे चंद्र इतर दिवशी दिसतो त्यापेक्षा खूप मोठा दिसतो आणि तो अधिक प्रकाशमान झालेला असतो. तेव्हा ११ ऑगस्ट ची सुपरमून पाहण्याची संधी चुकवू नका.