महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आज कोर्टात काय घडले?

महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज (४ ऑगस्ट) ही सुप्रीम कोर्टात निर्णय झालेला नाही. सोमवारी अर्थात ८ ऑगस्ट रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचे की नाही याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोग फक्त सुनावणी घेऊ शकतो मात्र, निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. याबाबत कोर्टाने सुचना दिलेल्या आहेत
कोर्टात नेमकं काय घडलं
- राज्यातील सत्ता संघर्षावर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी, कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली आहे.
- प्रकरण ५ न्यायधिशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही यावर सोमवारी सुनावणी
- तुर्तास पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेवू नये, कोर्टाचे निवडणूक आयोगाल निर्देश
- राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे कोर्टाने नुमद केले
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. शिंदे गटाच्या वतीने वकिल हरिश साळवे, वकिल नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल, वकिल मनु सिंघवी यांनी बाजू मांडली.