मनसे नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटनंतर सुप्रिया सुळे यांनी केली पोस्ट डिलिट

प्रबोधनकार ठाकरे यांची आज 137 वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर याबाबत मेसेज केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांना ट्विट करत अभिवादन केलं होतं मात्र काही वेळानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं कारण त्या ट्विटवरुन सुळे यांच्यावर टीका करण्यात आली.
प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एव्हढ्या मोठ्या झाला नाहीत ताई pic.twitter.com/WFBWpuDfby
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2022
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये प्रबोधनकार के. सी. ठाकरे असा उल्लेख केला होता.त्यांच्या ट्वीटलाच मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एव्हढ्या मोठ्या झाला नाहीत ताई. असे म्हटले. त्यानंतर काही कालवधीत सुप्रिया सुळे यांनी ते ट्वीट डिलिट केलं आणि पुन्हा नव्याने दुसरे ट्वीट केले आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे असा संपूर्ण उल्लेख केलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्वीट करत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन असे म्हटले आहे.