सुशांतच्या मृत्यूबदद्ल आमिरच्या भावाचा चकीत करणारा दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे तरी अद्याप त्याच्या मृत्यूचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. सीबीआय या प्रकरणी तपास करते आहे तर सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते वेळोवेळी न्यायाची मागणी करत असतात. सुशांत सिंहच्या मृत्यूचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान याने एक पोस्ट व्हायरल केलीय त्यात सुशांतच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा फैजलने केलाय.
फैजलने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले आहे. मला माहीत आहे की सुशांतची हत्या झाली होती. आता याचा उलगडा होतो की नाही हे येणारा काळच सांगू शकेल. अनेक एजन्सी या कामात गुंतले आहेत आणि त्याचा तपास करत आहेत असं तो एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. खरंतर अनेकदा सत्य समोर येत नाही. पण मी प्रार्थना करेन की सत्य लवकरच सर्वांसमोर येऊ दे आणि सर्वांना त्याबद्दल कळू दे असंही फैजलने सांगितले आहे.
या मुलाखतीत फैजलने सुशांतच्या मृत्यूबद्दल तसेच बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल ही भाष्य केलंय.‘मेला’ या चित्रपटातून फैजलने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं त्यानंतर तो कधीही मोठ्या पडद्यावर दिसला नाही.