फडणवीसजी तुम्ही जिंकलात, तुमचं अभिनंदन; सुषमा अंधारे यांचं सूचक ट्विट

ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर शिंदेंनी शिवसेनेवर आपला पुर्ण हक्क सांगितला. निवडणूक चिन्ह आणि शिवसेना खरी आमचीच आहे हा वाद कोर्टात गेला. त्यातील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा निकाल निवडणूक आयोग देणार असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. तेव्हा शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हा पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतलेला आहे. शनिवारी रात्री उशिराल निवडणूक आयोगाकडून हा निर्णय देण्यात आला. आता ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह तसेच शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलाय. यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
“आम्ही हरलो म्हणजे
— SushmaTai Andhare (@andharesushama) October 8, 2022
तुम्ही जिंकलात असं होत नाही
डाव तुमच्या हातात असला तरी
जिंकता तुम्हाला येत नाही”
मोदी-शहा जी फडणवीसजीतुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती.
पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू
मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन ! पण तुम्ही जिंकू शकलात कारण आमच्यातल्याच फितुरांनीच तुम्हाला साथ दिलेली आहे अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलेले आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलेलं आहे ते रद्द केलेले नाही याची नोंद सर्वांनी घ्यायला हवी. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील निर्णय ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे गटाला मिळू शकेल. मात्र या जर तरच्या बाबी आहे. सध्या तरी हा निर्णय तात्पूरत्या स्वरुपाचं आहे असे निवडणूक आयोगाने म्हटलेले आहे.