सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा फर्स्ट लुक !

प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेबसिरीजमधील पहिला लुक इंस्टाग्राम वर शेअर केलाय. टाळी वाजविण्याच्या पोजमधील हा सुष्मिताचा लूक ताली या वेब सिरीजमधील आहे. सुष्मिताने लूक शेअर करून ताली– बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी ! असे म्हटले आहे.

‘ताली’ या वेब सिरीजमध्ये सुष्मिता ट्रांसजेंडर गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून गौरी सावंत यांचे आयुष्य जगासमोर येणार आहे. गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी ट्रांसजेंडर समुदायाला समाजात आदर आणि सन्मान मिळवून देण्यासाठी काम करत आहेत.

सुष्मिता सेन लवकरच ताली वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तालीचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर सुष्मिता तिच्या लोकप्रिय वेब सिरीज आर्याच्या सीजन 3 वर काम सुरू करणार आहे अशी बातमी देखील समोर आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.