मिका सिंगला मिळाली दुल्हनियां !!

अखेर बॉलिवूड सिंगर मिका सिंगला त्याची दुल्हनिया मिळाली आहे.प्रदीर्घ काळानंतर मिका सिंगने आपली वधू निवडली आहे. ‘स्वयंवर- मिका दी वोटी’मध्ये आकांक्षा पुरी, प्रांतिका दास आणि नीत महल या तीन टॉप 3 कंटेस्टंटपैकी आकांक्षा पुरीनं बाजी मारली आहे.आकांशाने मिकावरच्या प्रेमाची कबुली दिली असून मिकाने तिला होकार दिला आहे.त्यामुळे आकांक्षा हीच ‘मिका दी वोटी’ ठरली आहे.
मिकाने त्याच्या अनेक वर्षाच्या मैत्रिणीलाच आपल्या आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले आहे. देशभरातून १२ तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर काहीजणी वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे आल्या होत्या. आकांक्षा पुरीची एन्ट्री या कार्यक्रमात वाईल्ड कार्डद्वारे झाली होती. ती ‘स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये उशिरा सहभागी झाली पण तिनेच मिकाचे मन जिंकले.आकांक्षाशिवाय दुसरं कोणी आपलं लाईफ पार्टनर होवू शकत नाही याची जाणीव मिकाला झाली आणि त्याने आपला जीवनसाथी म्हणून तिला होकार दिला.
कोण आहे आकांक्षा पुरी?
आकांक्षा पुरी ही मिकाची जुनी मैत्रिण आहे. मिकापेक्षा आकांशा बारा वर्षांनी लहान आहे. या दोघांची मैत्री दहा ते बारा वर्षे जुनी आहे. मिकासोबत इतर मुलींना पाहून माझा फार जळफळाट झाला. त्याचवेळी मला समजले माझे मिकावर किती प्रेम आहे आणि या शोमध्ये येण्याचा मी निर्णय घेतला असे आकांक्षाने सांगितलं होते.
दरम्यान सूत्रांच्या मते, ‘स्वयंवर- मिका दी वोटी’मध्ये मिकाने स्टेजवर लग्न केलं नाही. मिकाने वधू निवडली हे दाखवण्यासाठी आपण आकांक्षाच्या गळ्यात वरमाला घातली असे त्याने स्पष्ट केले आहे.विवाह करण्यांआधी मिका आपल्या वधुला म्हणजे आकांशाला समजून घेणार आहे. यानंतरच लग्न करणार असेही मिकाने सांगितले आहे