Malaika Arora Video: चाहत्यांसाठी गोड बातमी, मलायका करतेय दुसऱ्या लग्नाची तयारी…

मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, तीचे फोटो किंवा व्हिडीओ नेहमीच चाहत्यांसाठी एक पर्वणी असेच म्हणायला हवे. तिचा इंडस्ट्रीमधील फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. अर्जुन कपूरसोबतचं तिचं प्रेम जगजाहीर आहे. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय म्हणजे तो व्हिडीओ मलायकानेच इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात मलायका चक्क सुसंस्कृत स्टाईलमध्ये दिसलेली आहे.व्हिडिओमधील मलायकाचा लूक पाहून चाहत्यांना वाटतंय की मलायकाने दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केलीय.

बोल्ड ड्रेसमध्ये मलायकाला पाहायची आपल्या सगळ्यांना सवय झालेली आहे. पण जो व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय त्यात मलायकाने लाल रंगाचा सूट त्यानंतर रंगीबेरंगी लेहेंगा तर कधी अनारकली सूटमध्ये मलायकाचे अनेक भारतीय लूक्स व्हिडीओत पहायला मिळत आहेत. कपाळावर बिंदी तर कधी कानातले मोठे झुमके यामुळे मलायका दुसऱ्या रंगाची तयारी करते आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

खरंतर हा व्हिडीओ ब्रँड कोलॅबोरेशनचा आहे त्यात मलायका इंडियन वेअरच्या ब्रँडसाठी काम करतेय आणि त्या ब्रँडच्या ड्रेसेजमध्ये पोज देत तिने व्हिडीओ शेअर केलाय, पण काहीही म्हणा मलायकाचं सौर्दंय यातही खुलून दिसतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.