‘तनुश्री दत्ता’च्या पोस्टने पुन्हा खळबळ !!

अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन कायम चर्चेत असते. आता ही तनुश्रीने एक पोस्ट शेअर केली आहे त्यात अभिनेता नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफियांवर छळाचा आरोप करण्यात आला आहे. तनुश्री एव्हढ लिहून थांबलेली नाही तर मला काही झाली तर त्यासाठी नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफिया जबाबदार असतील असे ही तिने पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे.
तनुश्रीने लिहीलेल्या पोस्टमध्ये इंडस्ट्रीतील काही लोक आणि पत्रकारांवर फेक न्यूज चालविल्याचा आरोप केला आहे. अनेक लोक तिला टार्गेट करत असून तिचा छळ केला जातो आहे असे तनुश्रीचे म्हणणे आहे.‘मला कधीही काहीही झालं तर मी #MeToo चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, त्यांचे सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. कोण आहेत हे बॉलिवूड माफिया? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ज्यांची नावं पुन्हा पुन्हा समोर आली तीच लोकं’ असे स्पष्टपणे तनुश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
२०१८ मध्ये तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर #MeToo चा आरोप केला होता. २००९ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर गाण्याच्या शुटींग दरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्या खूप जवळ जाण्यााचा प्रयत्न केला असं तनुश्रीने सांगितले होते. नाना पाटेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुळे सगळीकडे आर्श्चय व्यक्त करण्यात येत होतं.