TDM च्या धमाकेदार टीझरचा धुमाकूळ ! ‘या’ दिवशी होणार रिलीज

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सिनेमा रिलीज होणार असून टीझर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. ख्वाडा आणि बबन चित्रपटामुळे कऱ्हाडे यांना खास ओळख मिळाली. आता ‘टीडीएम’ ची कथा इमोशनल की प्रॅक्टिकल आहे ते समजलेलं नाही पण पोस्टर प्रमाणे टीझरने प्रेक्षकांच्या उत्सूकता ताणलेल्या आहेत.
टीझरमध्ये एक पिळदार शरीरयष्ठी असलेला तरुण मुलगा खाणीत एकटाच काम करताना दिसतोय. त्यानंतर लांबून एक गाडी येताना दिसते आणि पुढे स्फोट होताना दिसतो एवढा टीझर असून ही सिनेमा वास्तविकतेचे दर्शन घडवणार असे वाटते आहे. या चित्रपटाचा नायक कोण ते समोर आलेलं नाही. या चित्रपटातील कलाकार कोण आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण एका गावाशी या चित्रपटाची कथा जोडलेली आहे असेही म्हटले जातेय. टीडीएम’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाला वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी संगीत दिलेलं आहे.