शिक्षक भरती MPSCमार्फत होणार?

राज्य शासनाला शिक्षक भरती MPSC मार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे आता येथुन पुढे होणाऱ्या शिक्षक भरती MPSC मार्फत होणार का? असा प्रश्न उपस्थि होतो आहे. मात्र यावर निर्णय होईपर्यंत सध्या शिक्षक भरती प्रक्रिया आहे त्या पद्धतीनेच पार पडणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. 

दरम्यान, जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला शिक्षण सचिव, एमपीएससीसुद्धा सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. पण भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यासाठी नियमांमध्ये, काही तांत्रिक बदल करणे गरजेचे असून त्या  नियमांमध्ये बदल होईपर्यंत जी शिक्षक भरती सुरू आहे ती पूर्ण होईल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले आहे. 

सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरती मागणी वारंवार केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.