शिवसेनेत खांदेपलटाची शक्यता !

शिवसेनेते मोठ्या खांदेपलटाची शक्यता वर्तविण्यात येते आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आता पुन्हा शिवसेनेत नवचैतन्य जागविण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरे आक्रमकपणे काम करताना दिसत आहेत. शिवसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला असून एक भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते आहेत.तेव्हा आता आदित्य ठाकरेंवर शिवसेनेच्या कार्यध्यक्ष्य पदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांमधून करण्यात येते आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरेंवर युवासेनेची धुरा द्यावी अशीही मागणी केली जाते आहे.
तेजस ठाकरे यांच्या भोवती ठाकरे ब्रँडचे वलय असल्यामुळे त्यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये नेहमीच आकर्षण आहे. शिवसेनेच्या काही मोजक्या कार्यक्रमांना ते दिसत असतात आणि तेजस तसे राजकारणपासून अलिप्त आहेत. पण जेव्हा सेनेतील दिग्गज नेते सोडून गेले आहेत तेव्हा हीच ती वेळ असे म्हणत तेजस यांनी राजकारणात सक्रिय व्हावे असे शिवसैनिकांना वाटते आहे.
युवासेना ही शिवसेनेची यंग ब्रिगेड असून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसारखे नेते यातूनच तयार झालेले आहेत. त्यामुळे जर तेजस ठाकरेंवर युवासेनेची जबाबदारी दिली तर राजकारणातील त्यांचा पाया मजबूत होईल. तसेच आदित्य ठाकरे यांनीही मजबूत साथ मिळेल त्यामुळे तेजस ठाकरे यांनी लवकरात लवकर राजकारणात प्रवेश करावा आणि पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करावा असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
राज्यात झालेले सत्ता परिवर्तन यानंतर शिवसेना संपते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आदित्य ठाकेर धडाडीने कार्य करतान दिसत आहेत, राज्यातील दौऱ्यानंतर आता तर शाखांमध्ये जावून ते मार्गदर्शन करणार आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांनी भरभक्कम साथ मिळते आहे. त्याचवेळी तेजसने राजकारणात प्रवेश केला तर शिवसेनेला मोठी बळकटी मिळेल. तेव्हा आदित्य ठाकरेंवर कार्याध्यक्ष पदाची तसेच तेजसवर युवासेनेची जबाबदारी द्यावी अशी चर्चा होते आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या दोन्ही लेकरांच्या खांद्यांवर कोणती जबाबदारी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.