TET परीक्षा घोटाळा, IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांचं निलंबन रद्द, प्रशासकीय सेवेत रुजू

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी आरोपी असलेले IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांचे निलंबन राज्य सरकारने रद्द केले आहे. सुशील खोडवेकर यांना आता पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत रुजू करण्यात आले आहे. महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सुशील खोडवेकर हे टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अटक असलेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असलेल्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी खोडवेकर यांना ताब्यात घेतले होते. २०११ सालात सुशील खोडवेकर अधिकारी तथा कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आधी शिक्षण विभागात आस्थापनांमध्ये उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांनी तुकाराम सुपे यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये निर्दोष सोडून दिले होते. जीए सॉफ्टवेअर या कंपनीस काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा आरोप खोडवेकर यांच्यावर ठेवण्यात आला होता.