राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती होणार, ‘या’ महिन्यात पुन्हा होणार ‘टीईटी’..!

राज्यात 15 हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असली तरी त्यानंतरही शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यात शिक्षक भरतीसाठी पुन्हा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
२०१४ पासून शिक्षण खात्याकडून टीईटी घेतली जाते आहे मात्र यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शिक्षक भरतीत अडचणी येत आहेत. शिवाय, ‘टीईटी’ पास झाल्यानंतर ‘सीईटी’ होते. राज्य सरकारने मे महिन्यात शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा घेतली होती. मात्र त्यात विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाल्याने अधिक प्रमाणात जागा असतानाही शिक्षकांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. म्हणून शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये पुन्हा टीईटी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यामधील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्यासुद्धा मोठी असल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे.. त्यापैकी 5 हजार जागा कल्याण, कर्नाटकामध्ये भरल्या जाणार आहेत अशी माहिती हाती आलेली आहे.