तीन मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंनी खास माणसाला उतरवलं !

शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार पाहीला तर आपल्याला लक्षात येईल तीन मंत्री एकट्या औरंगाबदा जिल्ह्यातील आहेच. शिंदे गटातील औरंगाबादच्या चार आमदारांपैकी दोघांना मंत्री केलंय. औरंगाबादवरील वर्चस्व कोणाचं यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे. शिंदे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादला झुकतं माप दिलंय असेही म्हटले जाते आहे. कारण ठाकरेंनर सातत्याने टीका करणारे अनुभवी आणि तीनवेळा आमदार असलेले संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.त्यातच आता उद्धव ठाकरेंनी शिरसाटांना डीवचलं आहे.औरंगाबादमध्ये ठाकरेंनी अंबादास दानवेंना पुढे केलंय.

मंत्रिमंडळात औरंगाबादमधले जे तीन मंत्री आहेत, त्यात दोघे शिंदे गटातले आहेत. पैठणचे आमदार संदिपान भुमरे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही शिंदेंनी मंत्री करण्यात आलं आहे. ज्या औरंगाबादमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटात तीव्र संघर्ष आहे, तिथे या दोन मंत्र्यांना उत्तर म्हणून काही तरी निर्णय घेणं भाग होतं. त्यासाठी ठाकरेंनी शोधलेला नेता म्हणजे अंबादास दानवे ! एकेकाळी शिवसेनेनं दानवेंवर निलंबनाची कारवाई केली होती. दानवेंचे राजकारण कायम वादग्रस्त राहीलेलं आहे. 

मंत्रिमंडळात औरंगाबादमधले जे तीन मंत्री आहेत त्यात दोघे शिंदे गटातले आहेत. एक आहेत संदिपान भुमरे आहेत जे आहेत पैठणचे आमदार तर अब्दुल सत्तार जे आहेत सिल्लोडचे आमदार. मराठवाड्याती या दोन्ही आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री केलेले आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे आधीपासूनच वर्चस्व आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर तर औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटात टोकाचा संघर्ष पहायला मिळतोय.तिथे या दोन मंत्र्यांना उत्तर म्हणून काही तरी निर्णय घेणं भाग होतं. त्यासाठी ठाकरेंनी शोधलेला नेता म्हणजे अंबादास दानवे ! एकेकाळी शिवसेनेनं दानवेंवर निलंबनाची कारवाई केली होती. दानवेंचे राजकारण कायम वादग्रस्त राहीलेलं आहे. 

अंबादास दानवे यांनी १९९८ मध्ये भगवा हातात घेतला म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला. २० वर्षांच्या राजकारणात दानवेंना महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा अनुभव आहे म्हणून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आलीय. दानवेंना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. आता शिवसेनेचा औरंगाबादमधला मराठा नेता म्हणून अंबादाल दानवेंकडे पाहिलं जातंय.

शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिरसाटांबरोबर त्यांचा संघर्ष पहायला मिळाला. दानवेंनी शिरसाटांवर टीका करून ठाकरेंना साथ दिली. जिल्ह्यातल्या राजकारणात अंबादास दानवेंना कायम झुकतं माप देण्यात आलंय. या दोन्ही गोष्टी हेरून जिथे शिरसाटांची संधी हुकली तिथे दानवेंना ठाकरेंनी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता केलं. औरंगाबादमध्ये परतल्यानंतर दानवेंचं जंगी स्वागतही करण्यात आलंय. आता औरंगाबादमध्ये ठाकरे आणि शिंदे वाद गाजणार यात शंकाच नाही. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.