शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे यांनी आज उपस्थिती लावली. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते टेंभी नाका देवीची आरती संपन्न झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे टेंभीनाका येथे देवीची आरती करण्यासाठी येणार होत्या म्हणून मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक टेंभीनाक्यावर जमा झाल्या होत्या.

रश्मी ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्या अनिता बिरजे आणि नगरसेविका नंदिनी विचारे या उपस्थित होत्या.यावेळी शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करुन रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमावर टीका केली होती. त्यामुळे रश्मी ठाकरे येणार की नाही अशा चर्चा देखील रंगल्या होत्या पण अखेर रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाका येथे येवून देवीची मनोभावे पूजा केली.

स्व. आनंद दिघे यांनी १९७८ पासून या महोत्सवाची सुरुवात केली होती. आनंद दिघे पूजापाठ याला खूप महत्त्व देणारे होते. नवरात्रीच्या उत्सवात ते मनोभावे  श्रद्धेने उपासना करायचे. आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंकडून ही परंपरा सुरु ठेवण्यात आली. दरम्यान शिंदे गटाकडून आज संध्याकाळी आरती करण्यात येणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.