…तर त्यांना ‘तुडवा’ असा आदेश देणारा बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल ते सांगता येत नाही. गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्र सत्तासंघर्षाने ढवळून निघाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली असून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरु आहेत. एकनाश शिंदेंसह ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांच्या अकाऊंटवर नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहेत. एकूणच शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत तीव्र नाराजीचं वातारण आहे. या सर्व गोष्टींचे पडसाद सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.
दरम्यान सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून फुटणाऱ्या आमदाराला रस्त्यात तुडवा असे म्हणत आहे.
एका जाहीर सभेत भाषण करतानाचा बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांच्या ठाकरी शैलीतील भाषण आजही मराठी माणसाच्या मनावर कोरलेले आहे.त्या भाषणात बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत, ‘यापुढे एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा.’ हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालेला आहे.