मराठमोळ्या सरन्यायधिशांची धडाकेबाज कामगिरी

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सुपरफास्ट कामगिरी केलेली आहे. कोर्टात वर्षानुवर्षे सुरु असलेली ‘तारीख पे तारीख’ची परंपरा मोडीत काढण्याच्या दिशेने सरन्यायाधीशांनी ठोस पाऊल टाकलेली आहेत. गेल्या चार दिवसांत त्यांनी जवळपास 1300 खटल्यांचा निपटारा केलाय.सुप्रीम कोर्ट जणू काही ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ बनल्याने सर्वसामान्य पक्षकारांना वेळीच न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
सेवानिवृत्त झालेले माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवृत्तीच्या दिवशी तारीख पे तारीखच्या मुद्द्यावर खंत व्यक्त केली होती. याकडे गंभीरपणे लक्ष देणार असल्याचा निर्धार नवे सरन्यायाधीश लळीत यांनी केला होता. त्यानूसार त्यांनी खटले निकाली काढण्याचा चांगलाच धडाका लावलाय.
गेल्या 4 दिवसांत कोर्टाने 1293 प्रकरणे निकाली काढलीत. त्यापैकी 440 बदली प्रकरणे आहेत. गेल्या दोन दिवसांत 106 नियमित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सरन्यायाधीश लळीत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.तसेच कोर्टात आता पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणांचे लिस्टींग होतेय अर्थात जास्त खटले सुनावणीसाठी घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केलंय.