‘हा’ व्हिडीओ पाहाच ! सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री.. एका चिमुकल्याकढून पोच पावती !

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि महाविकास आघाडी सरकार पडलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत. बंडखोर म्हणून त्यांच्यावर टीका झाली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची दमदार वाटचाल सुरु आहे.
एक सामान्य व्यक्तीमत्व ज्याने एकेकाळी रिक्षा चालवील होती त्या व्यक्तीच्या हातात आता महाराष्ट्राचं स्टेअरींग आहे. सर्वसामान्य माणसांचा मुख्यमंत्री असे त्यांना म्हटले जाते आहे. एकनाथ शिंदेंच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव अगदी लहान मुलांवर ही आहे याची प्रचिती एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये एक चिमुकला दिसतोय आणि त्याने हुबेहुब मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा पेहराव केलेला आहे. अगदी तसाच पांढरा पोशाख, दाढी अशी वेशभुषा त्या चिमुकल्याने केलेली आहे. गणेशोत्सवादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. तो चिमुकला स्टेजवर उभं राहिल्यावर अगदी मुख्यमंत्र्यांप्रमाणे जनतेला अभिवादन करताना दिसतोय. सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री.. एका चिमुकल्याकढून पोच पावती…असं ट्विट उदय सामंत यांनी केलेलं आहे.